Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात वेगवेगळय़ा थीमवर 17 मतदान केंद्रांची उभारणी

सातारा लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून अभिनव उपक्रम सुरू आहेत. सातारा मतदारसंघातील भौगोलिक, नैसर्गिक, ऐतिहासिक बाबी विचारात घेऊन वेगवेगळय़ा थीमवर 17 विशेष मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि स्कीप कक्षाच्या नोडल अधिकारी याशनी नागराजन यांच्या या संकल्पनेची जिह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

जिल्हाधिकारी डुडी यांनी जिह्यात राबवलेले उपक्रम राज्याने तसेच देशाने स्कीकारले आहेत. सातारा जिह्यात केलेल्या कामाची चर्चा होऊ लागली आहे. मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी, पर्यटन प्रकल्प असे बरेच विषय त्यांनी हाती घेतले आणि काही महिन्यांतच मार्गीही लावले आहेत.

सध्या लोकसभा निकडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही राज्यांमध्ये मतदान प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र, मतदानाचा घटता टक्का ही लोकशाहीसमोरील मोठी समस्या आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाची टक्केकारी काढकण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी क सीईओ याशनी नागराजन यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. सातारा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी जिह्यात 17 किशेष मतदान केंद्रे तयार केली आहेत.

‘बांबू लागवड’ या महत्त्काकांक्षी उपक्रमाचा संदेश या मतदान केंद्रांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. पांचगणी (ता. महाबळेश्वर), वाई नगरपालिका शाळा 23 (सातारा) या ठिकाण ‘बांबू’ ही थीम घेऊन मतदान केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रांकरून बांबू रोपेही दिली जाणार आहेत. केंद्रांवर बांबू या चित्रांचा कापर केला जाणार आहे.

सह्याद्री पर्वतरांगांच्या जंगलात अनेक दुर्मिळ पशू-पक्षी आढळतात. याच जंगलात वाघ असल्यामुळे हा परिसर ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ म्हणून घोषित केला आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ असल्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाची थीम घेऊन मुनावळे (ता. जावली) हे मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.

जगप्रसिद्ध कास पुष्प पठार हे सर्वश्रुत आहे. कास पठारावरील दुर्मिळ फुलांचे महत्त्व अधोरेखित करणारे पेट्री (ता. सातारा) हे मतदान केंद्र उभारण्यात येत आहे. सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱया या मतदान केंद्रावर कास पठारावरील फुलांच्या चित्रांचा कापर स्वागत कमानीसाठी करण्यात येणार आहे. कास पठारावर व फुलांच्या प्रजातींची माहिती या केंद्रावर लावली जाणार आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.

सातारा जिह्याला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कडूज (ता. खटाव) येथे ‘हुतात्मा’ या थीमवर मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱया हुतात्म्यांच्या फोटोंची स्वागत कमान, त्यांची माहिती देणारे फ्लेक्स, विविध रंगांचे फुगे यांचा वापर करण्यात येणार आहे.

लोकसभा निकडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा. मतदारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठीच विशेष मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी जतेंद्र डुडी यांनी सांगितले.

जय किसान थीमवर केंद्रे

सातारा जिह्याला कृषीची परंपरा आहे. काही पिके तर फक्त याच जिह्यात पिकत असल्यामुळे त्यांना ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. हीच खासियत किचारात घेऊन ‘जय किसान’ या थीमवर तडकळे (ता. खटाव), पिंगळी (ता. माण), कुसंबी (जावली), धुमाळकाडी (ता. फलटण), मेटगुताड (ता. महाबळेश्वर), देऊर (ता. कोरेगाव) याठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. या केंद्रांवर कडबा व शेतातील उत्पादनांचा कापर करून स्वागत कमान तयार केली जाणार आहे. शेतीशी संबंधित सेल्फी पॉइंट तसेच अंतर्गत सजावट असेल.

अपशिंगे मिल्ट्री, तांदूळवाडी व म्हसवडमध्ये ‘जय जवान’

सातारा जिह्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्या थीमवर ही अनोखी व लक्ष वेधून घेणारी मतदान केंद्रे तयार करण्यात येत आहेत. सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून देशभर ओळखला जातो. त्यामुळे अपशिंगे मिल्ट्री (ता. सातारा), तांदूळवाडी (ता. कोरेगाक) तसेच म्हसवड (ता. माण) येथे ‘जय जवान’ या थीमवर मतदान केंद्र उभारण्यात येत आहे. या मतदान केंद्राच्या सजावटीला मिलिटरी रंग असेल. सैनिकांचे फोटो असलेली स्वागत कमान, सैनिकांचे चित्र असलेली स्वागत कमान व प्रवेशद्वार, अंतर्गत सजावटही सैनिकी छाकणीसारखी, सैन्य भरतीबाबतची माहिती या केंद्रावर लावली जाणार आहे.