मोदींनी कुठे कुटुंब सांभाळले? शरद पवार यांचा टोला

मोदींनी कुठे कुटुंब सांभाळले? त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तर अतिशय चिंताजनक आहे, असा सणसणीत टोला लगावत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पवार या वयात स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते महाराष्ट्र काय सांभाळणार,’ या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

पंतप्रधान बेछूटपणे काही गोष्टी सांगत असतात. पण सरकारला ते करणं झेपेल की नाही? सरकारची तशी स्थिती आहे की नाही? याचा विचार ते करत नाहीत म्हणून पंतप्रधान मोदींबद्दलची आस्था कमी होत आहे.

शरद पवार म्हणाले, मलाही मोदींबद्दल माहिती आहे. त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? पण मी त्या स्तरावर जाऊ इच्छित नाही. त्यांची काwटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. पण असे व्यक्तिगत बोलू नये. हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. पण मीही हे पथ्य पाळू नये, ही भूमिका काही योग्य होणार नाही.

मोदी आठवडा मंत्री

आम्ही कधीतरी ऐकायचो की, जवाहरलाल नेहरू यांची सोलापूरला सभा होत असायची, पण नरेंद्र मोदी आठवडय़ाला येत आहेत. पंतप्रधान हे देशाचे असतात, मात्र आता आपण पाहत आहोत की, देशाचे पंतप्रधान मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत. दर आठवडय़ाला ते इकडे येत आहेत, असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला. पंतप्रधान मोदींना आता आमची विनंती आहे की, त्यांनी इकडे येत असताना विमानाने किंवा हेलिकॉप्टरने येऊ नये, तर गाडीने यावे. कारण इकडचे रस्ते तरी व्यवस्थित होतील.

– मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणांवर टीकाटिप्पणी केली होती, पण आज तेच निर्णय मोदी राबवत आहेत. लोक आता मनमोहन सिंग यांची दहा वर्षे आणि मोदींच्या दहा वर्षांची तुलना करत आहेत.

– मनमोहन सिंग यांचे वैशिष्टय़ होते की, ते कोणताही गाजावाजा न करता शांतपणे काम करायचे आणि रिझल्ट द्यायचे. मोदी साहेबांचा रिझल्ट माहीत नाही, पण टीकाटिप्पणीतच त्यांचा फार वेळ जातो.

भाजप नेत्यांना आत्मविश्वास नाही

भाजपाने ‘अब की बार 400 पार’ अशी घोषणा दिली, मात्र ही घोषणा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपाची दमछाक होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेंद्रीय गृहमंत्री किती वेळा महाराष्ट्रात येतात? यातून भाजप नेत्यांना आत्मविश्वास नाही हेच दिसून येते. निकालापर्यंत थांबा. भाजपाचा आकडा आणखी खाली आलेला दिसेल, असे शरद पवार म्हणाले.