ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित, कोहली, हार्दिक यांना विश्रांती

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाची सोमवारी घोषणा झाली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली असून, लोकेश राहुलकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. अखेरच्या तिसऱ्या सामन्यात सर्व वरिष्ठ खेळाडू संघात परतणार आहेत. अक्षर पटेलऐवजी वाशिंग्टन सुंदर व रविचंद्रन अश्विन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला सामना २२ सप्टेंबरला मोहालीत, दुसरा सामना २४ सप्टेंबरला इंदूरमध्ये, तर तिसरा सामना २७ सप्टेंबरला राजकोटमध्ये होणार आहे.

पहिल्या दोन वन-डेसाठी संघ : केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वाशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या वन-डेसाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, वाशिंग्टन सुंदर.