Misleading Ads Case: कारवाईसाठी तयार राहा! सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव यांना फटकारलं

योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण आज पतंजली आयुर्वेदच्या ‘फसव्या जाहिराती’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हजर झाले.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना चांगलीच चपराक लगावली. कारवाईसाठी तयार राहा! अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं रामदेव यांना सुनावलं.