Video – रेल्वे ट्रॅकवरून चालताना आजोबांचा पाय घसरला, चार महिन्याची नात थेट नाल्यात पडली

मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईकरांची दाणादाण उडवली. रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक प्रवासी खोळंबलेल्या लोकलमध्ये अडकून पडले होते. काहींनी लोकलमधून उतरून पायी जायचा मार्ग स्वीकारला. मात्र हे असं करणं एका महिलेला आयुष्यभऱाचं दु:ख देऊन गेलं आहे. भिवंडीच्या योगिता रुमाले या त्यांच्या वडिलांसोबत त्यांच्या चार महिन्याच्या मुलीला घेऊन जात असताना त्य़ांच्या वडिलांच्या हातून बाळ सटकले व थेट नाल्यात जाऊन पडले. मुसळधार पावसामुळे नालाही भरून वाहत होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यातील योगिता यांचा टाहो हा हृदय पिळवटून टाकणारा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

योगिता रुमाले (वय २५ वर्षे ) ही भिवंडी येथे राहणारी महिला तिच्या वडीलांसह मुंबईहून भिवंडी कडे निघाली होती. त्यांच्यासोबत योगिताची 4 महिन्याची मुलगी होती. पावसामुळे ट्रेन बराच वेळ ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान थांबली होती. त्यामुळे योगिता ही वडिलांसोबत ट्रेन मधून उतरून पायी कल्याणच्या दिशेने निघाली होती. योगिताची मुलगी ही तिच्या वडिलांच्या हातात होती. दरम्यान नाल्याजवळून जात असताना निमुळती वाट असल्यामुळे आजोबाचा पाय नाल्याजवळ अडकला आणि त्यांच्या हातातील ४महिन्याची मुलगी हातातून निसटुन वाहत्या नाल्यात पडली. हा नाला कल्याण खाडीला जाऊन मिळतो. कल्याण रेल्वे पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल असून मुलीचा शोध घेण्यात येत आहे .