पंतप्रधान मोदींचं वागणं, बोलणं संविधानविरोधी; बाळासाहेब थोरात यांची टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे महागाई, बेरोजगारीवर काहीच बोलत नाही. त्यांचं वागणं, बोलणं हे संविधान विरोधी आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तर थोरत यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधानपद हे उच्चपद आहे. कुठल्या एका पक्षाचं नाही. एखाद्या पक्षाचा प्रचार करताय तेव्हा निवडणुकीच्या काळात आपण समजू शकतो. गेल्या 5-10 वर्षांता आपण काय-काय कामं केली, देशाची अर्थव्यवस्था कशी बदलली? शिक्षण व्यवस्था कशी विकसित केली? रोजगार कसा निर्माण केला? नागरिकांचं जीवनमान कंस उंचावलं? ह्या गोष्टी सांगणं आणि पुढच्या पाच वर्षांच्या योजनांबाबत सांगणं गरजेचं आहे. पण पंतप्रधान मोदी यावर काहीच बोलत नाहीत. ना रोजगारावर बोलत, ना महागाईवर बोलत. देशाच्या राज्यघटनेच्या बाबतीत जी मुलभूत तत्व आहेत ती सर्वांना समान आहेत. असं असताना त्यांचं वागणं, बोलणं हे त्याविरोधात आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

स्वातंत्र्य चळवळीशी संबंध नसणाऱ्यांच्या हाती देशाची सत्ता; सांगलीतून शरद पवारांचा घणाघात

‘संकटातून बाहेर कसं पडायचं हे पवारांना माहिती’

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय होणार आहे. तीन साडेतीन लाखाहून अधिक मताधिक्क्याने सुप्रियाताई जिंकून येतील. हा माझा आकडा लक्षात ठेवा, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

शरद पवारसाहेबांनी अनेक संकटं हाताळलेली आहेत. ते शांत डोक्याने संकटं हाताळतात. पक्ष आमचे वेगळे आहेत, मात्र मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. आधी ते काँग्रेसमध्ये होते आणि आता राष्ट्रवादीत आहेत. संकटाला सामोरं कसं जायचं याचा विचार करतात आणि संकट दूर करतात हे वैशिष्ट्य त्यांचं आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात; शरद पवार यांची टीका