कर्करोगग्रस्त युवकाच्या मांडीचे संपूर्ण हाड बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी

कर्करोगावरील उपचार पुरविणाऱ्या देशातील काही अग्रगण्य हॉस्पिटल चेन्सपैकी एक असलेल्या HCG ICS खुबचंदानी कॅन्सर सेंटर, मुंबई येथील विशेषज्ज्ञ डॉक्टरांच्या एका पथकाने सार्कोमा किंवा हाडाच्या कर्करोगाचा सामना करणाऱ्या एका 29 वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार केले. HCG ICS खुबचंदानी कॅन्सर सेंटरचे सीनिअर कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जन डॉ. हरेश मंगलानी यांच्या नेतृत्व लाभलेल्या या पथकामध्ये डॉ. राजेश रोहिरा आणि डॉ. अमित बाली या असोसिएट सर्जन्सचा समावेश होता तर डॉ. प्रणव व डॉ. शुभम यांनी हे असिस्टंट सर्जन्स होते.

बांग्लादेशचा नागरिक असलेल्या एकावर पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चरसाठी मायदेशीच उपचार करण्यात आले होते. कर्करोगामुळे हाडावर होणाऱ्या प्रक्रियेमुळे आधीच कमकुवत झालेल्या हाडांना एखाद्या किरकोळ आघातामुळे किंवा दुखापतीमुळे होणारे फ्रॅक्चर पॅथोलॉजिकल फ्रॅक्चर या गटात मोडते.

या व्यक्तीला जानेवारी 2023 मध्ये अशाप्रकारची किरकोळ दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याच्या डाव्या मांडीचे हाड मांडीच्या मध्यभागात फ्रॅक्चर झाले होते. बांग्लादेशमध्ये इन्ट्रा मेड्युलरी नेलिंग पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. शस्त्रक्रियेदरम्यान बांग्लादेशमधील डॉक्टरांनी फ्रॅक्चर झालेल्या भागाचा नमुना घेऊन तो चाचणीसाठी पाठविला. या चाचणीतून त्याला हाडांचा कर्करोग असल्याचे निदान झाले. हे निदान खरे असल्याची पुन्हा एकदा खात्री करून घेण्यात आली व रुग्णाला ढाका येथील एका ऑन्कोलॉजिस्टकडे पाठविण्यात आले. या प्रकारच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया हा उपचाराचा एकमेव पर्याय असल्याचे ढाक्याच्या डॉक्टरांनी रुग्णाला सांगितले. तसेच कटिभागातून अॅम्पुटेशन म्हणजे अंगच्छेदन करणे एवढी एकच उपचारपद्धती बांग्लादेशमध्ये उपलब्ध आहे आणि आपला पाय वाचवायचा असेल तर उपचारांसाठी मुंबईला जावे लागेल असेही रुग्णाला सांगण्यात आले.

मुंबईला येत असताना ट्रेनमधून उतरत असताना रुग्णाला शिंकांची मोठी उबळ आली. रुग्णाच्या ज्या मांडीच्या भागामध्ये झालेल्या फ्रॅक्चरवर उपचार करण्यात आले होते, त्याच पायाच्या हिप भागामध्ये या शिंकामुळे आणखी एक फ्रॅक्चर झाले.

आपल्या या स्थितीवर उपचार घेण्यासाठी रुग्ण HCG ICS खुबचंदानी कॅन्सर सेंटर येथे पोहोचला. इथे दाखल झाल्यानंतर त्याच्या स्थितीचे निदान करण्यासाठी हॉस्पिटलमधील विशेषज्ज्ञांनी त्याच्या अनेक चाचण्या करून घेतल्या. या चाचण्यांमधून असे आढळून आले की, रुग्णाचे फ्रॅक्चर झालेले डाव्या मांडीचे हाड संपूर्णपणे काढून टाकणे आणि धातूचा कृत्रिम भाग तिथे बसविणे हा उपचाराचा सर्वोत्तम मार्ग ठरू शकेल. ही शस्त्रक्रिया गुंतागूंतीची होती, पण हॉस्पिटलमधील शल्यचिकित्सकांची टीम अत्यंत निष्णात होती. रुग्णाला कोणत्याही गुंतागूंतीशिवाय आपले दैनंदिन आयुष्य पुन्हा पूर्ववत पद्धतीने जगता यावे अशाप्रकारे त्याला आजारातून बरे करणारे सर्वोत्तम परिणाम आपण रुग्णासाठी साध्य करू शकू याचा आत्मविश्वास त्यांच्याठायी होता.

शस्त्रक्रियेचे तपशील सांगताना डॉ. हरेश मंगलानी म्हणाले, “रुग्णाला सार्कोमा या आजाराचे निदान झाले होते, मानवी शरीरामध्ये मांडीच्या प्रदेशात असणाऱ्या फेमर हाडातून या कर्करोगाची सुरुवात झाली होती. मांडीच्या मध्यभागामध्ये झालेल्या पहिल्या फ्रॅक्चरसाठी इंट्रा मेडुयलरी नेलिंग या पद्धतीद्वारे उपचार करण्यात आले होते. इन्ट्रा मेड्युलरी नेलिंग प्रक्रिया ही सर्वसामान्य फ्रॅक्चरवरील उपचारांसाठी योग्य आहे पण पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चरच्या बाबतीत याच पद्धतीमुळे कर्करोगाची प्रक्रिया हाडाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पसरू शकते. त्यामुळे आता कर्करोग त्याच्या डाव्या मांडीच्या संपूर्ण हाडामध्ये पसरणे शक्य होते. रुग्णाचे हाड आधीच दोन वेळ फ्रॅक्चर झाले होते, त्यामुळे ते हाड शस्त्रक्रिया करून काढून टाकल्यास सर्वोत्तम परिणाम साधणे शक्य झाले असते. आम्ही रुग्णावर संपूर्ण हाड बदलण्याची शस्त्रक्रिया केली, ज्यात आम्ही कर्करोगाने बाधित असलेले मांडीचे संपूर्ण हाड (फेमर) काढून टाकले आणि त्याजागी धातूचे प्रोस्थेसिस बसविले व हिप भागात आणि गुडघ्याच्या सांध्यांमध्ये इम्प्लान्ट्स बसवले. या प्रक्रियेमध्ये संपूर्ण हाड आणि दोन सांध्यांची परिणामकारकरित्या पुनर्बांधणी करण्यात आली. या पुनर्बांधणीमुळे भविष्यात रुग्णाच्या हालचाल करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणार नाही.”

“दर १००० रुग्णांपैकी २०-३० लोकांवर बोन ट्यूमरचा परिणाम होतो व बाधित भागामध्ये वेदना होणे व सूज येणे व नेहमीच्या औषधोपचारांनी या वेदना कमी न होणे ही याची लक्षणे आहेत. त्यानंतर हळूहळू त्या भागाची कार्यक्षमता कमी होत जाते व रात्री असह्य वेदना होतात. रामन यास झालेल्या सर्कोमावर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार होता. अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया या गुंतागूंतीच्या असतात, ज्यात हिप भागाच्या वरपासून शस्त्रक्रियेस सुरुवात करावी लागते व गुडघ्याच्या खालच्या भागापर्यंतचा ती केली जाते रक्तवाहिन्या आणि चेतापेशी कर्करोगाने बाधित हाडाच्या भोवती साठतात व कर्करोगाने ग्रस्त हाड रक्तवाहिन्या आणि चेतापेशींच्या भोवती बोटांच्या आकारात पसरते. रक्तवाहिन्या आणि चेतापेशींना जपावे लागते, जेणेकरून पाय वाचावा आणि त्याने योग्य प्रकारे काम करावे. रुग्णाचे वय केवळ 29 वर्षे होते आणि चांगले 50 ते 60 वर्षांचे आयुष्य त्याला काढायचे आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेतून चांगले आणि परिणामकारक निष्पन्नच निघायला हवे याचे प्रचंड दडपण आमच्या संपूर्ण टीमवर होते. आम्ही योजलेले सर्व परिणाम आम्ही साध्य करू शकलो आणि रुग्णाला एक चांगला, वापरण्याजोगा, काम करणारा अवयव देऊ शकलो, याचा आम्हाला आनंद आहे”, असं डॉ. हरेश मंगलानी पुढे म्हणाले.