
टिटवाळा रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकल गाडय़ांना थांबा देण्यासाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी शुक्रवारी रात्रीपासून पुढील 15 दिवस मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रफिक व पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रोज रात्री 5 ते 6 तास काम करण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल व एक्सप्रेस गाडय़ांची वाहतूक कोलमडणार असल्याने प्रवाशांची परतीच्या प्रवासात तारांबळ उडणार आहे.
28 ऑगस्टच्या रात्रीपासून 11 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी या मोठय़ा ब्लॉकची माहिती देतानाच 1 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंतचा रेल्वे वाहतुकीतील बदल जाहीर केला. 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक रात्री 11.30 ते पहाटे 5.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक कल्याण आणि वासिंद स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ ईशान्य दिशेकडे (सर्व क्रॉसओव्हर पॉइंट्स वगळून) घेतला जाईल. ब्लॉक अवधीत टिटवाळा आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
28 ऑगस्ट रोजी रद्द होणाऱ्या लोकल फेऱ्या
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 10.00, 10.50 आणि 11.42 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी- टिटवाळा लोकल. – टिटवाळा येथून 9.00 आणि 10.06 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी लोकल. – टिटवाळा येथून 11.14 वाजता सुटणारी ठाणे लोकल आणि आसनगाव येथून 11.08 वाजता सुटणारी ठाणे लोकल.
29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी रद्द होणाऱ्या लोकल फेऱ्या
– सीएसएमटी येथून 10.00, 10.50, 11.16 आणि 11.42 वाजता सुटणाऱ्या लोकल
– सीएसएमटी येथून 8.41 आणि 10.00 वाजता सुटणाऱ्या कुर्ला लोकल.
– सीएसएमटी येथून 8.56 वाजता सुटणारी आसनगाव लोकल
– सीएसएमटी येथून 8.08 वाजता सुटणारी ठाणे लोकल
– कुर्ला येथून 5.59 वाजता सुटणारी कल्याण लोकल – ठाणे येथून 5.35 वाजता सुटणारी टिटवाळा लोकल
– सीएसएमटी येथून 12.08 वाजता सुटणारी कसारा लोकल
– टिटवाळा येथून 6.13, 9.00 आणि 10.06 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी लोकल आणि 10.25 आणि 11.14 वाजता सुटणाऱ्या ठाणे लोकल
– आसनगाव येथून 11.08 वाजता सुटणारी ठाणे लोकल – कल्याण येथून 7.02 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल.





























































