ऑक्‍सफोर्ड इंटरनॅशनलच्‍या अभ्यासातून नवी माहिती समोर; उच्‍च शिक्षण घेण्‍यास प्रेरित करणारे हे आहेत महत्त्वाचे घटक

परदेशात शिक्षण घेण्‍यामधील विद्यार्थ्‍यांचे प्राध्‍यान्‍यक्रम आणि आव्‍हानांवरील निष्‍पत्ती ऑक्‍सफोर्ड इंटरनॅशनलच्‍या स्‍टुडण्‍ट ग्‍लोबल मोबिलिटी इंडेक्‍स (एसजीएमआय) च्‍या पहिल्‍या पर्वाच्‍या भाग होत्‍या स्‍टडीमधून निदर्शनास आले की, 50 टक्‍के हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांनी परेदशात शिक्षणासाठी पहिल्‍या क्रमांकाचा प्रेरणादायी घटक म्‍हणून सर्वोत्तम करिअर संधींचा उल्‍लेख केला, तर 42 टक्‍के भारतीय विद्यार्थ्‍यांनी सांस्‍कृतिक अनुभवाचा उल्‍लेख केला आणि 41 टक्‍के हिंदुस्थान विद्यार्थ्‍यांनी परदेशात शिक्षणासाठी अव्‍वल प्रेरणादायी घटक म्‍हणून भाषा कौशल्‍यांच्‍या विकास उल्‍लेख केला. स्‍टडीमधून निदर्शनास आले की, हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांनी परदेशात शिक्षण घेण्‍यासाठी सर्वात मोठा अडथळा म्‍हणून राहणीमानाच्‍या खर्चाचा उल्‍लेख केला.

परदेशात शिक्षण घेण्‍याच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षांमध्‍ये वाढ होत असताना ऑक्‍सफोर्ड इंटरनॅशनलच्‍या नवीन स्‍टडीमधून निदर्शनास आले आहे की, हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांसाठी परदेशात उच्‍च शिक्षण घेण्‍याकरिता सर्वोत्तम करिअर संधी, जागतिक संस्‍कृती आणि भाषा कौशल्‍ये विकसित करणे हे अव्‍वल प्रेरणादायी घटक ठरली आहेत. स्‍टडीमधून निदर्शनास आले की, 50 टक्‍के हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांनी परेदशात शिक्षणासाठी पहिल्‍या क्रमांकाचा प्रेरणादायी घटक म्‍हणून सर्वोत्तम करिअर संधींचा उल्‍लेख केला, तर 42 टक्‍के हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांनी सांस्‍कृतिक अनुभवाचा उल्‍लेख केला आणि 41 टक्‍के भारतीय विद्यार्थ्‍यांनी परदेशात शिक्षणासाठी अव्‍वल प्रेरणादायी घटक म्‍हणून भाषा कौशल्‍यांच्‍या विकास उल्‍लेख केला.

याव्‍यतिरिक्‍त स्‍टडीमधून निदर्शनास आले की, परदेशात उच्‍च शिक्षण घेण्‍यामध्‍ये सर्वात मोठे अडथळे म्‍हणून 50 टक्‍के हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांनी ‘राहणीमानाचा खर्च’चा उल्‍लेख केला आणि 35 टक्‍के हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांनी ‘उच्‍च ट्यूशन फी’चा उल्‍लेख केला. ऑक्‍सफोड इंटरनॅशनलच्‍या स्‍टुडण्‍ट ग्‍लोबल मोबिलिटी इंडेक्‍स (एसजीएमआय)च्‍या पहिल्‍या पर्वाचा भाग म्‍हणून निष्‍पत्ती प्रकाशित करण्‍यात आल्‍या. एसजीएमआयचा परदेशात उच्‍च शिक्षण घेण्‍याच्‍या संधींचा शोध घेत असलेल्‍या पदवीपूर्व विद्यार्थ्‍यांचे प्राधान्‍यक्रम आणि त्‍यांना सामना कराव्‍या लागणाऱ्या आव्‍हानांबाबत सर्वसमावेशक माहिती प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे.

जागतिक विद्यार्थी संशोधनामधील प्रतिष्ठित स्‍पेशालिस्‍ट्स ऑक्‍सफोर्ड इंटरनॅशनल आणि द नॉलेज पार्टनरशीप यांच्‍या सहयोगाने करण्‍यात आलेल्‍या एसजीएमआय स्‍टडीमध्‍ये 500 हून अधिक विद्यमान व संभाव्‍य विद्यार्थ्‍यांचा नमुना आकार समाविष्‍ट आहे. जागतिक विद्यार्थी गतीशीलता क्षेत्राला आकार देणारे प्रेरणास्रोत व अडथळ्यांची सर्वसमावेशक माहिती घेत हिंदुस्थान, पाकिस्‍तान, व्हिएतनाम व नायजेरिया अशा प्रमुख बाजारपेठांमधून सहभागींना काळजीपूर्वक निवडण्‍यात आले.

हे स्‍टडी आणि त्‍यामधील निष्‍पत्तींबाबत मत व्‍यक्‍त करत ऑक्‍सफोर्ड इंटरनॅशनल एज्‍युकेशन सर्विसेसचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मोहित गंभीर म्‍हणाले, ‘आम्‍हाला आमची माहितीपूर्ण स्‍टडी ऑक्‍सफोर्ड इंटरनॅशनलचे स्‍टुडण्‍ट ग्‍लोबल मोबिलिटी इंडेक्‍सचे पहिले पर्व लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. परदेशातील शिक्षण सेवा क्षेत्रातील व्‍यापक अनुभवासह आम्‍ही संधी देण्‍यासह दर्जेदार शिक्षण किफायतशीरपणे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी जागतिक विद्यार्थी समुदायासोबत सतत काम केले आहे. यंदाच्‍या आमच्‍या स्‍टडीमधील निष्‍पत्ती रोचक आहेत आणि भारतीय विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वसमोवशक गरजा, प्राधान्‍ये व आव्‍हानांबाबत नवीन माहिती देते, जी शैक्षणिक क्षेत्राला नवीन आकार देण्‍यामध्‍ये महत्त्‍वाची भूमिका बजावेल. आम्‍हाला विश्‍वास आहे की, एसजीएमआय बहुमूल्‍य माहिती प्रदान करण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, ज्‍यामुळे आंतरराष्‍ट्रीय उच्‍च शिक्षणाच्‍या भवितव्‍याला आकार मिळेल.’

ऑक्‍सफोर्ड इंटरनॅशनलच्‍या अभ्यासातून नवी माहिती समोर; उच्‍च शिक्षण घेण्‍यास प्रेरित करणारे हे आहेत महत्त्वाचे घटक

जागतिक संस्कृती आणि भाषा कौशल्‍ये विकसित करणे हे विद्यार्थ्‍यांना उच्‍च शिक्षण घेण्‍यास प्रेरित करणारे सर्वोच्‍च घटक

अभ्यासातून समोर आलेल्या इतर प्रमुख गोष्टी

● 42 टक्‍के विद्यार्थ्‍यांचा विश्‍वास आहे की, विशिष्‍ट विषयाचा अभ्‍यास केल्‍याने पदवी शिक्षणादरम्‍यान त्‍यांच्‍या रोजगार क्षमतेमध्‍ये वाढ होईल, तर इतर देशांमध्‍ये ही टक्‍केवारी जास्‍त आहे जसे पाकिस्‍तान (49 टक्‍के), नाय‍जेरिया (54 टक्‍के) आणि व्हिएतनाम (46 टक्‍के).

● जवळपास 35 टक्‍के हिंदुस्थानच्या विद्यार्थ्‍यांना वाटते की, त्‍यांना परेदशात शिक्षण घेतल्‍याने करिअरमध्‍ये उत्तम पगाराची नोकरी मिळण्‍याची संधी असेल.

● हिंदुस्थानातील पदव्‍युत्तर विद्यार्थी (52 टक्‍के) वैयक्तिक हितासाठी विविध कौशल्‍ये व ज्ञान मिळवण्‍याला अधिक प्राधान्‍य देतात.

● हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांपैकी 14 टक्के विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या देशांतर्गत कोर्सपेक्षा परेदशातील कोर्समध्‍ये नोंदणी करणे अधिक आव्‍हानात्‍मक वाटते.

● रोचक बाब म्‍हणजे फक्‍त 30 टक्‍के हिंदुस्थानी विद्यार्थ्‍यांना परेदशात उच्‍च शिक्षण घेण्‍यासाठी स्‍थलांतर व व्हिसा प्रक्रिया आव्‍हानात्‍मक वाटते.