केसीआर यांच्या मुलीला ईडीचे समन्स

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना ईडीने समन्स पाठवले आहे. दिल्लीतील दारू घोटाळय़ाप्रकरणी हे समन्स पाठवले असून उद्या, शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीबीआयने कविता यांची चौकशी केलेली आहे.

ईडीच्या आरोपानुसार के. कविता या आम आदमी पार्टीच्या विजय नायर यांच्या संपका&त होत्या. विजय नायरने साऊथ ग्रुप नावाच्या एका ग्रुपकडून कमीत कमी 100 कोटी रुपयांची लाच घेतली आहे. गेल्या वर्षी सीबीआयने विजय नायरला अटक केली आहे. के. कविता या पक्षाच्या नेत्या असून विधान परिषदेतील आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.