Video आता बोला! मिंध्यांची जुनी विधाने भूत बसून मानगुटीवर बसली

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी विधानसभेत पहिल्यांदा भाषण केलं होतं त्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार व छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली होती. अजित पवार काम करू देत नाहीत, बाळासाहेबांना तुरुंगात टाकणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसल्यामुळे आपण वेगळा मार्ग निवडला असा दावा त्यांनी केला होता. आता तेच अजित पवार व छगन भुजबळ हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात सामिल झाले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा दुटप्पीपणा समोर आला आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे व इतर गद्दारांच्या विधानांचे व्हिडीओ शिवसेनेने शेअर केले आहेत. त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी गद्दारांना चांगलेच फटकारले आहे. त्यामुळे त्यांचीच जुनी विधाने आता भूत बनून त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत.

शिवसेनेशी गद्दारी करून भाजपशी हातमिळवणी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे गॅसवर आहेत. राजभवनात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादा सरकारमध्ये ‘इन’ झाल्याने आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरून ‘आऊट’ होणार हे नक्की झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार सरकारमध्ये गेले हे निश्चित नसले तरी 16 मिंध्यांवर लवकरच अपात्रतेची टांगती तलवार कोसळणार आणि नंतर सरकार कोसळू नये म्हणून भाजपने केलेली ही बेगमी असल्याचे मानले जाते.