चिन्ह भरणा यंत्रांच्या सुरक्षेविषयी निवडणूक आयोगाचे नवे आदेश

निवडणूक चिन्हांचे अपलोडिंग केल्यावर ही चिन्ह भरणा यंत्रे सुरक्षितपणे जतन करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोग एकदम सक्रिय झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे योग्य प्रकारे पालन व्हावे यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्था करण्याचे निर्देश बुधवारी एका निवेदनाद्वारे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांना आयोगाने दिले आहेत.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्याविषयी नुकतीच सुप्रीम कोर्टात घमासान सुनावणी झाली होती. या वेळी खंडपीठाने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित काही निर्देश आयोगाला दिले होते. त्यानुसार, आता चिन्ह भरणा यंत्रे निवडणूक लढवणाऱया उमेदवारांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या स्वाक्षरीनंतर सीलबंद करून पंटेनरमध्ये सुरक्षित ठेवावीत असे कोर्टाने म्हटले आहे.