राजस्थान सरकार 1.3 कोटी महिलांना 3 वर्षांचा डेटा मोफत देणार

राजस्थानात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तिथल्या सरकारने एक मोठी घोषणा केली आहे  गुरुवारपासून मुख्यमंत्री डिजिटल सेवा योजनेअंतर्गत 1.3 कोटी महिलांना स्मार्टफोन वितरीत केले जाणार आहे. यामध्ये तीन वर्षांचा मोफत डेटा असेल असे तिथल्या सरकारने जाहीर केले आहे.

पहिल्या टप्प्यात, राज्यभरात विशेष शिबिरांच्या माध्यमातून जयपूरमधील 1.9 लाख महिलांसह लाभार्थ्यांना प्रत्येकी 6,800 रुपये किमतीचे 40 लाख स्मार्टफोन वितरित केले जातील.  सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला या योजनेअंतर्गत Realmi आणि Redmi या दोन कंपन्यांचे मोबाइल फोन उपलब्ध करून दिले जातील. नंतर सॅमसंग आणि नोकियासारख्या कंपन्यांचे फोनही उपलब्ध होतील.

“या योजनेअंतर्गत फोनसाठी 6,125 रुपये आणि मोफत इंटरनेटसाठी 675 रुपये दिले जातील. इंटरनेट शुल्कासाठी राज्य दर वर्षी 900 रुपये देखील देईल,” असे एका सूत्राने सांगितले. लाभार्थ्यांना त्यांचे जन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि नावनोंदणी कार्ड आणावे लागेल, तर विधवांना त्यांचे पीपीई कार्ड दाखवावे लागेल असे तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.