अंबानींना मागे टाकून गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंती व्यक्ती

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स (BBI) वर मागे टाकून हिंदुस्थान आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. श्रीमंत व्यक्तींच्या जागतिक क्रमवारीत अदानी 12 मध्ये पोहोचले आहेत. तर अंबानी 13 व्या स्थानावर फक्त एक स्थान खाली आहेत. 97.6 अब्ज डॉलर्स संपत्तीसह, अदानी समूहाचे संस्थापक आता जगातील 12 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि यादीतील सर्वात श्रीमंत हिंदुस्थानी आणि आशियाई व्यक्ती आहेत. त्यांनी शेवटच्या यादीतील स्थानावरून 7.67 अब्ज डॉलर्स कमावले आहेत. आणि वर्ष-टू-डेट 13.3 अब्ज डॉलर्स कमावले आहेत.

जानेवारी 2023 मध्ये, हिंडेनबर्ग रिसर्च, न्यूयॉर्क स्थित शॉर्ट सेलरने अदानी समूहावर दीर्घकाळ स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग अनियमिततेचा आरोप केला. अदानी समूहाने या दाव्यांचे खंडन केले. या आरोपांनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे अदानींची तब्बल 60 टक्क्यांनी घसरण झाली. ती 69 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली होती.

दरम्यान, अंबानी आता 97 अब्ज संपत्तीसह हिंदुस्थान आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती 13 व्या स्थानावर आहेत. शेवटच्या बदलानंतर त्यांनी 764 दशलक्ष मिळवले आहेत आणि त्याच्या संपत्ती YTD(Year to date) म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला 665 दशलक्ष जोडले आहेत. बीबीआय टॉप 50 मधील इतर हिंदुस्थानमध्ये 34.6 अब्ज डॉलर्ससह शापूर मिस्त्री 38 व्या स्थानावर आणि शिव नाडर 33 अब्ज डॉलर्ससह 45 व्या स्थानावर आहेत.