गँगस्टर गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर गोल्डी ब्रार याचा अमेरिकेत मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकन वृत्तवाहिनीने केला आहे. गोल्डी ब्रारला अमेरिकेतील फेअरमाँट आणि हॉल्ट एव्हेन्यू येथे गेल्या मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोळय़ा घालण्यात आल्याचे वृत्त संबंधित वृत्तवाहिनीने दिले आहे.