स्नॅपचॅटवर प्रेम झालं, प्रियकरानेच अपहरण करत 1 कोटींची मागणी केली; पोलिसांनी 48 तासात छडा लावला

गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील 14 वर्षीय कोमलची (बदलेल नावं) स्नॅपचॅट या सोशल मिडीया माध्यमावर उत्तर प्रदेशच्या समीर पठानशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. समीर पठान कोमलला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी झाला. खोट्या आनाभाका घालत समीरने कोमलला भेटण्यासाठी सुरतला बोलवलं.

कोमल घरातल्यांचा डोळा चुकवत एकटीच नवसारी वरुन समीरला भेटण्यासाठी सुरतला गेली. समीरने केलेलं नियोजन यशस्वी ठरलं आणि कोमल अलगद त्याच्या जाळ्यात फसली. त्यानंतर त्याने कोमलच्या कुटुंबीयांना वॉट्सअप कॉल केला आणि 1 कोटी रुपयांची मागणी केली.

कुटुंबीयांनी तात्काळ अपहरणाची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तातडीने सुत्र हालवत आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. राजस्थान आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अवघ्या 48 तासात लखनऊ येथून कोमलची सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या विविध टिम अपहरणाचा छडा लावण्यासाठी कार्यरत होत्या. तसेच कोमलच्या आई-वडिलांनी आरोपी समीर पठानला 12,000 रुपये ट्रान्सफर केले होते आणि वॉट्सअॅपवर त्याच्याशी बोलणं सुरु ठेवलं होतं. यामुळेच स्नॅपचॅट आणि वॉट्सअप कॉल डिटेल्सच्या माध्यामातून कोमलचा आणि गु्न्हेगारांचा शोध घेण्यास मदत मिळाली.

पोलिसांनी समीर पठान, अभिषेक चौधरी आणि प्रदिप चौधरी यांना लखनऊ जवळील बसमधून पकडले आणि दुसरा आरोपी मोहीत चौधरी याला दिल्लीतील झोपडपट्टी परिसरातून अटक केली आहे.