दोन परदेशी मोबाईल कंपन्यांची 6 हजार 500 कोटींची करचुकवेगिरी, 11 राज्यांमध्ये आयकर विभागाची छापेमारी 

हिंदुस्थानात कार्यालये असलेल्या दोन परदेशी मोबाईल आणि मोबाईल हँडसेट बनवणाऱ्या कंपन्यांनी 6 हजार 500 कोटींची करचुकवेगिरी केली असल्याचे उघड झाले. आयकर विभागाने गेल्या आठवडयात 11 राज्यांमध्ये छापेमारी करत ही करचुकवेगिरी उघड केली आहे. करचुकवेगिरी करण्यात कंपन्यांबरोबर कंपन्यांशी संबंधीत उच्चपदस्थ अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

आयकर विभागाची धोरणे ठरवणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) च्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली 21 डिसेंबरला ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत रॉयल्टीच्या रूपाने हे पैसे परदेशातील खात्यात पाठवले असल्याचे उघड झाले. मात्र, दोन्ही कंपन्यांची नावे आयकर विभागाने उघड केलेली नाहीत.

कर्नाटक, तमिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, आँध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान आणि दिल्लीतील एनसीआरमध्ये ही छापेमारी करण्यात आली.

मूळ करचुकवेगिरी ही 5 हजार 500 कोटींची असून त्यावर 1 हजार कोंटींचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ही रक्कम 6 हजार 500 कोटींवर गेली आहे.

रॉयल्टीच्या रूपाने पैसे परदेशातील खात्यात पाठवले.

आयकर विभागाने कंपनीची नावे उघड केलेली नाहीत.