निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक; राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह प्रमुख नेत्यांची सुप्रीम कोर्टात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार याद्यांमधील नावे वगळल्याप्रकरणी आणि कथित एसआयआर घोटाळा प्रकरणी इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह अन्य नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आली आणि अनियमितता झाली, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, टीएमसीचे सौगत रॉय, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही याचिका दाखल करण्यात आली.