मोदींच्या भाषणाची चौकशी सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बांसवाडा येथे केलेल्या विखारी विधानाची चौकशी निवडणूक आयोगाने सुरू केल्याचे वृत्त आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या मालमत्तेचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल, असे विधान मोदी यांनी केले होते. त्यानंतर पंतप्रधानांविरोधात काँग्रेस आणि माकपने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र तक्रारीही केल्या होत्या.

मोदींचे विधान हे दोन समाजात फूट पाडणारे, दुर्भावनापूर्ण आणि विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारे आहे, अशी तक्रार करत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची विनंती काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर निवडणूक आयोगाने भाजपवर तत्काळ कारवाई करावी आणि मोदींवर गुन्हाही दाखल करावा अशी मागणी सीपीआय(एम)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे.