IPL 2024 : विराट कोहलीला दिग्गज खेळाडूने दिला मोलाचा सल्ला, होणार बंगळुरूचा विजय?

आयपीएल सुरुवात झाली असून आतापर्यंत 16 सामने खेळवले गेले आहेत. मात्र आरसीबीला अजूनही सूर गवसलेला नाही. Womens Permier League मध्ये बंगळुरूच्या (RCB) संघाने WPLचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे ड्यु प्लेसिसच्या बंगळुरूकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बंगळुरूने चार सामने खेळले असून फक्त एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. त्यामुळे चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. अशातच बंगळुरूच्या एका माजी खेळाडूने विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हीलीयर्सने त्याच्या युट्यूब चॅनलवर विराट कोहलीला खास सल्ला दिला आहे. “संघाला चांगली सुरुवात करून दिल्यावर विराटने पहिल्या 6 ओव्हर्सपर्यंत मैदानावर संयमी खेळ केला पाहिजे. ड्यु प्लेसिसने जास्त रिस्क घेतली पाहिजे तर, विराटने स्वत: 6 ते 15 ओव्हर्सपर्यंत मैदानावर टिकून राहिले पाहिजे. त्याने असाच खेळ केला पाहिजे तेव्हाच आरसीबीचे फलंदाज ताकदीने खेळ करतील”, असा महत्त्वाचा सल्ला डिव्हीलियर्सने विराट कोहलीला दिला आहे.

“आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. पण वाईटही झाली नाही. त्यामुळे संघाला दोन चांगल्या विजयांची गरज आहे. आशा आहे की संघ चिन्नास्वामी या घरच्या मैदानावर परत येण्यापूर्वी बाहेर होणाऱ्या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करेल”, असे म्हणत डिव्हीलीयर्सने आरसीबीच्या सुमार खेळावर भाष्य केले आहे.