जियो फायबर सेवा लाँच, देणार 14 ओटीटी सेवा; 599 रुपयांपासून सुरुवात

रिलायन्स जियोने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तब्बल आठ शहरांमध्ये फायबर सेवा लाँच केली आहे. या सेवेच्या माध्यमातून एक जीबीपीएसपर्यंतचा जबरदस्त स्पीड मिळेल तसेच हाय डेफिनेशन व्हिडीओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग आणि कुठल्याही अडथळय़ाशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सेवा मिळेल. जियो फायबरद्वारे तब्बल 14 ओटीटी सेवांचा आनंद घेता येईल.

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी या सेवेची घोषणा 28 ऑगस्ट रोजी केली होती. 6 ते 12 महिने कालावधीसाठी जियो एयर फायबर सेवेचा प्लान घेता येईल. 12 महिन्यांच्या सेवेसाठी कुठल्याही प्रकारचे इन्स्टॉलेशन शुल्क नसेल. 599 रुपयांपासून जियो फायबरची सुविधा घेता येईल. मुंबई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई आणि पुण्यात ही सुविधा मिळू शकेल.