पावसाळय़ाआधी सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण करा! कंत्राटदार, अभियंत्यांना आयुक्तांची तंबी

मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी पावसाळ्याआधी सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांची सुरू असलेली कामे 31 मे पूर्वी पूर्ण करा, खड्डे बुजवा, रस्त्याची डागडुजी करा अन्यथा पंत्राटदार आणि अभियंत्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, अशी तंबी पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज पालिकेच्या संबंधित अधिकाऱयांना दिली.

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर आवश्यक तेथे डागडुजीकामी पंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेच्या सातही परिमंडळांतील विविध रस्त्यांवर मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात मुंबईतील सिमेंट-काँक्रीट रस्त्यांसह सर्वच रस्त्यांची चांगली स्थिती राखली जाईल, यासाठी नियोजनपूर्वक कामांना वेग दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात खड्डे (बॅड पॅच) बुजवण्यासाठी पालिकेच्या 7 परिमंडळात 14 पंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

असे होतेय काम

– पालिकेकडून 398 किलोमीटर रस्ते सिमेंट-काँक्रीटीकरणासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. यापैकी पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात मिळून 325 किलोमीटर अंतरापैकी काही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.

– तर शहर विभागातील एक निविदा रद्द करण्यात आली आहे. रस्ते सिमेंट-काँक्रीटीकरण प्रकल्पातील निविदेच्या अटीनुसार, सर्व रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत, आवश्यक तेथे अपूर्ण रस्त्यांचे पुनर्पृष्ठाrकरण करण्याच्या सूचना पंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत.

सेवा रस्त्यांची लवकरच दुरुस्ती!

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरदेखील दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) डागडुजीकामी पंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठीदेखील महानगरपालिका प्रशासनाकडे सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार लवकरच सेवा रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.