वर्ध्याचा गड काबीज करण्याचे आव्हान; रामदास तडस, अमर काळे यांच्यात कडवी झुंज

>>महेश उपदेव

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गेल्या दहा वर्षांपासून भाजपने हा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे. प्रथमच या निवडणुकीत काँग्रेसच्या ऐवजी शरद पवार यांची राष्ट्रवादी रिंगणात आहे. विद्यमान खासदार रामदास तडस विरुद्ध माजी आमदार अमर काळे अशी कडवी झुंज येथे बघायला मिळणार असून वर्ध्याचा गड काबीज करण्याचे आव्हान दोन्ही उमेदवारांसमोर आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख व काँग्रेसच्या नेत्यांनी अमर काळे यांच्यासाठी पंबर कसली आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन वेळा जाहीर सभा घेतल्या. हिंगणघाटमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांची जाहीर सभा झाली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच ऊर्जा निर्माण झाली असून उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून ते जोमाने कामाला लागले आहेत. यामुळे दोनवेळा जातीच्या भरवशावर खासदार झालेले रामदास तडस यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे.

कौटुंबिक कलहामुळे अडचण

भाजपचे उमेदवार रामदास तडस यांची स्नुषा पूजा तडस निवडणुकीत उतरली असून ‘विदर्भ केसरी’ असणाऱया रामदास तडस यांना ही निवडणूक फारशी सोपी राहिलेली नाही. पूजा तडस आणि खासदार महोदयांचा काwटुंबिक कलहामुळे तडस यांची अडचण झाली आहे.

दहा वर्षे खासदार म्हणून काय केले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तडस यांच्यासाठी सभा झाली पण मतदारसंघात फारशी वातावरण निर्मिती झाली नाही. उलट मतदारच खासदार म्हणून तुम्ही दहा वर्षांत वर्धाच्या विकासासाठी काय केले? असा सवाल करू लागले आहेत.

वर्धा लोकसभा मतदारसंघ वार्तापत्र

मतदारांमध्ये  केंद्र सरकारबद्दल नाराजी

केंद्र सरकारबाबत मतदारांमधील नाराजीची सुप्त लाट पाहता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांना विजयाचा आत्मविश्वास आहे. त्याचवेळी भाजपचे उमेदवार तडस मोदींच्या करिष्म्यावर तिसऱयांदा विजयी होण्याची स्वप्नं पाहत आहेत.

z भाजपला देवळी शहरातील भांडणात गोटे उचलण्याच्या व्हायरल व्हिडीओ क्लिपसह कौटुंबिक कलहाच्या क्लिपचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
z मोदी सरकारच्या काळात म्हणावा तसा विकास या भागात झालेला नाही. खासदार दत्तक गावांचा किती विकास झाला, हा प्रश्नही यानिमित्ताने लोकचर्चेत आला आहे.
z विदर्भातील शेतकऱयांना भेडसावणाऱया समस्यांचे निराकारण करण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याने शेतकऱयांमध्ये नाराजी आहे.