कुचबिहार-बीजापूरमध्ये मतदानाला गालबोट; एका जवानाचा मृत्यू, तर एक जखमी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. अशातच पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या माथाभांगा येथे निवडणूक ड्युटीवर असताना सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर दुसऱ्या घटनेत छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा मतदारसंघात मोठा स्फोट होऊन सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी रात्री घडली आहे. पश्चिम बंगालमधील माथाभांगा येथील एका मतदान केंद्रातील बाथरुममध्ये सीआरपीएफ जवान बेशुद्धावस्थेत सापडला. नागरिकांनी त्या जवानालसा तत्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत. घोषित केले. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, जवानाच्या डोक्याला दुखापत झाली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जवान बाथरुममध्ये पडला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत काही माहिती मिळालेली नाही, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आङेत.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज शुक्रवारी सुरु आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्य आणि केद्रशासित प्रदेशातील 102 मतदार संघात मतदान सुरु आहे.

छत्तीसगडच्या बस्तर लोकसभा मतदारसंघात स्फोट

छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा मतदारसंघात मोठा स्फोट झाला आहे. युबीजीएल (under barrel grenade launcher) सेल फुटून एक सीआरपीफ जवान जखमी झाला आहे, त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. जखमी सीआरपीएफ जवान ड्युटीवर होता. त्यावेळी हा स्फोट झाला आणि तो जखमी झाला.