मणिपूरमध्ये गोळीबारात एक ठार, तीन जखमी

कांगपोकपी जिल्ह्यात रविवारी ग्रामसंरक्षक आणि एका सशस्त्र गटात झालेल्या गोळीबारात एक ठार आणि तिघे जखमी झाले. रविवारी सकाळी कांगपोकपी जिह्यातील उंच टेकडीवरून डझनभर बंदूकधाऱयांनी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील काwत्रुकवर गोळीबार केला होता. त्याला गावातील स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिले. नंतर ही चकमक हळूहळू कडंगबंद आणि सेंजम चिरांगच्या लगतच्या गावांमध्ये पसरली, असे पोलिसांनी सांगितले. आज या हत्येच्या निषेधार्थ कांगपोकपी जिल्हा-आधारित आदिवासी एकता समितीने 12 तासांचा बंद पाळला होता.