कॅलिफोर्निया गोळीबारात मारला गेलेला गँगस्टर गोल्डी ब्रार नाही; अमेरिकन पोलिसांच्या माहितीनं खळबळ

गायक सिद्धू मूस वालाच्या हत्येमागील गुंड गोल्डी ब्रार याचा कॅलिफोर्नियातील गोळीबारात मृत्यू झाल्याच्या वृत्ताचं अमेरिकन पोलिसांनी खंडन केलं आहे.

फ्रेस्नो, कॅलिफोर्नियामधील फेअरमाँट आणि होल्ट अव्हेन्यूमध्ये काल वादानंतर दोन पुरुषांना गोळ्या घातल्या. त्यापैकी एकाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला, असं अमेरिकन पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेत मारलेली व्यक्ती कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. हे वृत्त काही वृत्तसंस्थांनीही लावून धरलं.

फ्रेस्नो पोलीस विभागानं आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे, असं म्हटलं आहे की ते ‘चुकीचं’ वृत्त आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, एका प्रश्नाला उत्तर देताना लेफ्टनंट विल्यम जे. डूली म्हणाले की, ‘गोल्डी ब्रार हा गोळीबाराचा बळी ठरल्याचा दावा खोटा असल्याचं सांगितलं’.

प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टना ‘चुकीची माहिती’ म्हणून उडवून लावत लेफ्टनंट म्हणाले की पोलीस विभाग जगभरातून चौकशी करत आहे.

‘सोशल मीडिया आणि ऑनलाइन न्यूज एजन्सींवर चुकीची माहिती पसरवली आहे. त्यामुळे आम्हाला जगभरातून चौकशीसाठी फोन येत आहे. ही अफवा कोणी पसरवली केली याची अद्याप पुष्टी झालेली नाही, पण ती व्यक्ती नक्कीच गोल्डी नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काही स्थानिक वृत्तानुसार, या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीची ओळख आता 37 वर्षीय झेवियर गॅल्डनी म्हणून झाली आहे.

सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार हा वॉन्टेड गुन्हेगार आहे आणि त्याला बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. इंटरपोलने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती आणि त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले आहे.