मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी येणार? हिंदुस्थानी रेल्वेला तारीख सांगता येईना

मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या बुलेट ट्रेनच्या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी येणार. ही कामे कधी वेग घेणार, असा सवाल माहिती अधिकार कायद्यांतर्गत करण्यात आला होता. परंतु, याबाबतची निश्चित तारीख सांगता येणार नाही. जमीन संपादनापासून विविध कामे मार्गे लागल्यानंतरच बुलेट ट्रेनचा प्रकल्प वेग घेईल असे हिंदुस्थानी रेल्वेने म्हटले आहे.

बुलेट ट्रेनच्या 508 किलोमीटर लांबीच्या मार्ग नॅशनल हायस्पीड रेल्के कॉर्पेरेशन लिमिटेड उभारत आहे. हा प्रकल्प कधी आकाराला येणार अशी विचारणा माहिती अधिकाराखाली हिंदुस्थानी रेल्वेला करण्यात आली होती, त्यावर रेल्वेने निश्चित तारीख सांगता येणार नाही असे उत्तर दिले. मध्य प्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेख गौर यांनी माहिती अधिकाराखाली हिंदुस्थानी रेल्वेला सवाल केला होता. या प्रकल्पाची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली. डिसेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार होता. परंतु, अद्याप भूसंपादनापासून अनेक कामे रखडल्याची कबुली हिंदुस्थानी रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

उत्तरेकडे अद्याप कुठेच रेल्वेमार्गाची उभारणी करण्यात आलेली नाही. 6 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 157 किलोमीटरचा सेतू उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

आतापर्यंत 295.5 किलोमीटरचे स्तंभ आणि 153 किलोमीटरचा कायडक्ट म्हणजे सेतू उभारण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्केमंत्री अश्विनी कैष्णक यांनी काही दिवसांपूर्की एक्सकरून दिली होती.