
पुणे महानगरपालिकेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याच्या काही तासानंतरच मुंबई महानगरपालिकेतही धमकीचे ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ईमेलमधून मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालय, महापौर कार्यालय, शेअर मार्केट बिल्डिंग, महानगरपालिकेचे कार्यालय बॉम्बने उडवून देणार असल्याचे या ईमेलमध्ये म्हटले आहे. खलिस्तानींकडून ही धमकी देण्यात आल्याचे समजते.




























































