भांडुपमधील 40 वर्षे जुन्या आरे स्टॉलवर पालिकेची कारवाई; महाराष्ट्र दूध वितरक सेनेकडून पुनर्बांधणीची मागणी

पालिकेच्या अधिकाऱयांनी कोणतीही पूर्वसूचना न देता भांडुपच्या एस वॉर्डसमोरील 40 वर्षे जुने आरे सरिता पेंद्र निष्कासित केले. त्यामुळे स्टॉलधारकावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दूध वितरक सेनेने निषेध व्यक्त करीत या स्टॉलची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली.

बृहन्मुंबई दूध योजनेच्या कुर्ला दुग्धशाळाअंतर्गत संजय बाबर हे गेल्या 40 वर्षापासून आरे सरिता पेंद्र क्रमांक 115 चालवित आहेत. पालिकेच्या एस. विभाग परिरक्षण विभागाच्या अभियंत्यांनी कोणतीही मौखिक अथवा लेखी पूर्वसूचना न देता 26 एप्रिल रोजी सदर स्टॉल निष्कासित केले. त्यामुळे बृहन्मुंबई दूध योजना व महाराष्ट्र शासन यांच्यासह पेंद्रधारकाचे आर्थिक नुकसान होऊन बाबर यांचे उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. पेंद्रावर कारवाई करत ज्येष्ठ नागरिकाला अशा प्रकारे रस्त्यावर आणण्याच्या कृतीचा महाराष्ट्र दूध वितरक सेनेतर्फे निषेध करण्यात आला.

संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राम कदम, कोषाध्यक्ष विलास भुजबळ तसेच स्टॉलधारक संजय बाबर यांनी दुग्ध व्यवसाय विभाग आयुक्त, बृहन्मुंबई दूध योजनेचे महाव्यवस्थापक यांच्यासह पालिकेच्या एस विभागाचे विभाग अधिकारी यांनादेखील निवेदन देण्यात आले. निष्कासित केलेल्या पेंद्राची महानगरपालिकेने पुनर्बांधणी करून द्यावी अथवा शासकीय नियमानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी सदर निवेदनाद्वारे संघटनेने केली.