गुजरात किनारपट्टीवरून 3300 किलो ड्रग्ज जप्त, पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक

गुजरातमधील पोरबंदरच्या किनारपट्टीवरून नौदलाने तब्बल 3300 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी गुजरात एटीएस, नौदल व नार्कोटिक्स विभागाने मिळून संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या पथकांनी पोरबंदर बंदारावरून एका छोट्या बोटीला ताब्यात घेतले होते. त्या बोटीत तब्बल 3300 कोटींचे ड्रग्ज आढळून आले. एकूण जप्त केलेल्या ड्रग्जमध्ये 3089 किलो चरस, 158 किलो मेथाफेटामिन आणि 25 किलो मॉर्फिनचा समावेश आहे.