जीबीएस आजाराचा कहर; पेरूमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित

दक्षिण अमेरीकेजवळ असलेल्या पेरू या देशात गुइलेन- बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या विचित्र आजाराने हाहाकार माजला आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या पार्श्वभूमीवर पेरू देशात आरोग्य आणीबाणी जाहिर करण्यात आली आहे. या आणीबाणीचा कालावधी 90 दिवसांचा असेल असे तेथील शासनाने घोषित केले आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 200 झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना काळात लसीमुळे होणाऱ्या आजारांमध्ये जीबीएस चा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता.

जीबीएस (गुइलेन – बॅरे – सिंड्रोम) हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती नकळत मज्जातंतूंवर हल्ला करू लागते. यूएस एनआयएच्या मते, जीबीएस हा एक दुर्मिळ न्युरोलॉजिरल आजार आहे. मज्जातंतूचे जाळे मेंदुवर असते. रोगप्रतिकारक प्रणाली नकळत परिधीय मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे या आजाराला बळी पडलेल्या अनेक रूग्णांना अर्धांगवायू होतो. हा अनुवांशिक किंवा संसर्गजन्य रोग नसल्याचे तज्ञांचे मत आहे. परंतू हा आजार नेमका कशामुळे होतो याचा उलगडा देखील झालेला नाही.

जीबीएसची लक्षणे
हा रोग मज्जातंतूंवर हल्ला करत असल्याने, रुग्णांमध्ये सुन्नपणा, मुंग्या येणे, श्वास घेताना त्रास होणे आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांमध्ये वाढ झाल्यास रूग्णाला अर्धांगवायूमध्ये होण्याची शक्यता असते. जीबीएस रुग्णांमध्ये खूप अशक्तपणा येतो किंवा काही दिवसातचं स्वास्थ बिघडू लागते. दोन आठवड्यांच्या आतचं रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येतात. तिसऱ्या आठवड्यापर्यंत रूग्ण 90 % अशक्त होतात. अद्याप या आजारावर कोणतीही लस नसली तरी औषधोपचारांनी त्याची तीव्रता कमी होते.