Photo – अमृता देशमुखची पहिली संक्रांत, हलव्याचे दागिने घालून शेअर केले फोटो

अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे यांचे नोव्हेंबर महिन्यात दणक्यात लग्न पार पडले. संगीत, मेहेंदी, हळद, लग्न, रिसेप्शन असे सर्व सोहळे पार पाडत हे दोघे लग्न बंधनात अडकले. या मकरसंक्रांतीला अमृताची पहिली संक्रांत होती. त्यानिमित्ताने तिने काळ्या रंगाची साडी व हलव्याचे दागिने परिधान केले होते.