प्रभासने राम मंदीरासाठी 50 कोटी रुपये केले दान? काय आहे यामागचे सत्य

अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान प्रसिद्ध अभिनेता प्रभास याने राम मंदिरासाठी 50 कोटींची देणगी दिल्याची सध्या चर्चा आहे. तसंच , 22 जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी जेवणाचा खर्च प्रभास उचलणार आहे असेही बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका राजकीय कार्यक्रमात, आंध्र प्रदेशचे आमदार चिरला जगिरेड्डी यांनी दावा केलेला की  प्रभास हा राम मंदीर उद्घाटनाच्या दिवशीचा जेवणाचा खर्च  करणार आहे. त्यावरून प्रभासबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. दरम्यान आता प्रभासच्या टिमने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, प्रभासच्या बाबतीत करण्यात आलेले सर्व दावे खोटे असून या सर्व अफवा आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राम मंदीर उद्घाटन सोहळ्यासाठी प्रभासला आमंत्रित करण्यात आले की नाही याबद्दल माहिती उपलब्ध नाही. रजनीकांत, चिरंजीवी, राम चरण, धनुष आणि इतर अनेक दक्षिणेकडील अभिनेत्यांना 22 डिसेंबर रोजी अयोध्येतील समारंभात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे.