सामना अग्रलेख – आंतरराष्ट्रीय धूळफेक

जगभरात भांडणेही आपणच लावायची आणि शस्त्रास्त्रांची विक्रीही आपणच करून मालामाल व्हायचे, हा खरेतर अमेरिकेचा जुना धंदा आहे. आता मात्र आक्रित घडले. युक्रेनला युद्ध सामुग्रीही द्यायची व रशियाच्या नजरेतही यायचे नाही यासाठी अमेरिकेने पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रे खरेदी करून परस्पर युक्रेनला पाठवली. त्या बदल्यात पाकला मोठे कर्जही मिळवून दिले. ‘सांप भी मरे, और लाठी भी न टूटे’ अशीच ही आंतरराष्ट्रीय धूळफेक आहे. अमेरिकेचे पाताळयंत्री डोकेच असे उद्योग करू शकते!

आंतरराष्ट्रीय धूळफेक! अमेरिका आणि पाकिस्तान हे दोन्ही देश कायमच तमाम जागतिक समुदायाची दिशाभूल करीत असतात. आताही तेच घडले आहे. भयंकर आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या पाकिस्तानला वाचवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानसोबत एक गुप्त करार केला व त्यामुळेच पाकिस्तानला दोन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून ३ अब्ज डॉलरचे वेल आऊट पॅकेज मिळाले, अशी ताजी बातमी आहे. पाकिस्तानला हे कर्ज मिळवून देण्यात अमेरिकेने जो भूमिका पार पाडली ती जेवढी अनाकलनीय आहे, तेवढीच वैश्विक समुदायाला चकित करणारीही आहे. अमेरिकेने एखाद्या देशाकडून शखाखे खरेदी केली यावर कुणी, कधी विश्वास ठेवेल काय? ते देखील पाकिस्तानसारख्या फाटक्या देशाकडून? पण या गुप्त करारानुसार तसेच घडले आहे. अमेरिकेने पाकिस्तानकडून तब्बल ९०० दशलक्ष डॉलर्सची शस्त्राने खरेदी केली व रशियासोबत युद्ध करणाऱ्या युक्रेनकडे ही शखाखे सुपूर्द केली. हीच पाकिस्तानी शखाखे, तोफा व दारूगोळा आज युक्रेन रशियाविरुद्धच्या युद्धात वापरत आहे. पाकिस्तानातील ‘इंटरसेप्ट’ या अमेरिकन वेबसाईटने या गुप्त कराराचा पर्दाफाश केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळवण्यासाठी

परकीय चलनाच्या गंगाजळीची
जी ‘अट टाकण्यात आली होती, ती पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला जगातील कोणत्या ना कोणत्या देशाकडून दोन अब्ज डॉलर्सचे कर्ज घेणे क्रमप्राप्त होते. मात्र पाकिस्तानची आधीच बुडीत खात्यात गेलेली कर्जे व उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था पाहता एकही देश पाकिस्तानला कर्ज देण्याची जोखीम घेण्यास तयार नव्हता. पाकिस्तानच्या पाठीशी कायम उभे राहणाया देशांनीही हात झटकले तेव्हा नेहमीप्रमाणे अमेरिकेनेच पुढाकार घेऊन पाकिस्तानला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. यासाठी अमेरिकेने नामी शक्कल लढवली. युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने झुकलेल्या इम्रान खान यांना आधी अमेरिकेने पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने सत्तेतून बेदखल केले. त्यानंतर पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीची तिजोरी भरलेली दाखवण्यासाठी पाकिस्तानकडून शखाखे खरेदी करण्याची योजना अमेरिकेने पाकसमोर ठेवली. ‘मरता क्या नहीं करता?? या उक्तीप्रमाणे आर्थिक संकटातून तात्पुरते का होईना वाचण्यासाठी पाकिस्तानने ही अट मान्य केली. त्यानंतर ‘ग्लोबल मिलिटरी प्रोडक्टस् च्या माध्यमातून अमेरिका – पाकमध्ये शास्त्र खरेदीचा व त्या मोबदल्यात नाणेनिधीचे कर्ज मिळवून देण्याचा छुपा समझोता झाला. अत्यंत गोपनीय पद्धतीने झालेल्या या कराराचे बिंग ‘इंटरसेप्ट’ने फोडल्यानंतर अमेरिका व पाकिस्तान या दोन्ही देशांनी अद्याप यावर एका अक्षराचीही प्रतिक्रिया दिली नाही. दोन्ही देशांचे हे मौन पुरेसे बोलके आहे. वास्तविक

अमेरिका व पाकिस्तान
या दोन्ही देशांचे नेते व मुत्सद्दी अधिकारी एकीकडे उभय देशांतील संबंध किती ताणले गेले आहेत, असे भासवत असतात आणि दुसरीकडे त्यांच्या लपूनछपून गळाभेटी व छुपे करारही सुरू असतात. आजवर दोन्ही देशांच्या या चुंबाचुंबीचे पितळ अनेकदा उघडे पडले. अमेरिका व पाकिस्तानची हीच अभद्र युती पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, असा आंतरराष्ट्रीय बनवाबनवीचा खेळ अमेरिका व पाकिस्तान कायमच खेळत असतात. आताही तेच घडले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचे ‘बेल-आऊट पॅकेज मिळवून देण्यासाठी अमेरिकेने जो गुप्त करार केला, तीदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाची केलेली दिशाभूलच आहे. जगभरात मांडणेही आपणच लावायची आणि शाखांची विक्रीही आपणच करून मालामाल व्हायचे, हा खरेतर अमेरिकेचा जुना चंदा आहे. आता मात्र आक्रित घडले. युक्रेनला युद्ध सामुग्रीही द्यायची व रशियाच्या नजरेतही यायचे नाही यासाठी अमेरिकेने पाकिस्तानकडून शखाणे खरेदी करून परस्पर युक्रेनला पाठवली. त्या बदल्यात पाकला मोठे कर्जही मिळवून दिले. ‘सांप भी मरे, और लाटी भी न टूटे अशीच ही आंतरराष्ट्रीय धूळफेक आहे. अमेरिकेचे पाताळयंत्री डोकेच असे उद्योग करू शकते!