
महिला आरक्षण हा विरोधाचा विषयच नाही पण त्याचे श्रेय मोदींनी घेऊ नये, महिलांना अधिकार मिळाले पाहिजेत ही या महाराष्ट्राची पहिली भूमिका आहे. इतिहास घडवण्याचा ठेका भाजपने घेतलेला नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.
”आमचा या धोरणाला पाठिंबा आहेच. पण ज्या पद्धतीने डिलीमीटेशन होणार आहे त्यावर चर्चा सुरू आहे. महिला आरक्षण हा विरोधाचा विषय नाही पण त्याचे श्रेय मोदींनी घेऊ नये. इतिहास घडवण्याचा ठेका भाजपने घेतलेला नाही. महिला आरक्षणाची मुहुर्तमेढ शरद पवारांनी रोवली आहे. ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू यांचा वारसा महिला आरक्षणासंदर्भात फार मोठा आहे. महिलांना अधिकार मिळाले पाहिजेत ही या महाराष्ट्राची पहिली भूमिका आहे. इतिहास घडवण्याचा ठेका जो भाजपचे लोकं घेऊन फिरतायत ते चुकीचे आहेत. हा आमचा आत्मा आहे”, असे संजय राऊत म्हणाले.



























































