सूरज चव्हाण यांना अटक, ईडीने केली कारवाई

जनतेच्या न्यायालयात मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर दिलेल्या निकालाचे पोस्टमॉर्टेम झाले. शिवसेनेच्या महापत्रकार परिषदेत कायदेतज्ञांनी या निकालाची अक्षरशः चिरफाड केली आणि ठिकऱ्या उडवल्या. नार्वेकर यांचा निकाल कसा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करणारा आहे, याची सबळ पुराव्यांसह मांडणीच यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या या महापत्रकार परिषदेनंतर चवताळलेल्या सरकारने शिवसेनेविरोधात सूडाचे राजकारण सुरू केले आहे. जनता न्यायालयानंतर ईडीने शिवसेनेच्या सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते.