शिवसेनेचा मुलुंडमध्ये आजपासून मालवणी महोत्सव

 

खाजे, शेंगदाणा लाडू, खडखडे लाडू, कुळथाची पिठी, आंबा-फणसपोळी, मालवणी मसाले, कोलंबीचं लोणचं, कोंबडी वडे, सोलकढी, मच्छी प्राय, तिरफळं घालून केलेलं तिखल्याचं कालवण अशी मालकणी पक्कान्नांची लज्जत मुलुंडकासीयांना चाखायला मिळणार आहे. निमित्त आहे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवप्रभात मित्रमंडळाने आयोजित केलेल्या भव्य मालवणी महोत्सवाचे. या महोत्सवाचे उद्घाटन उद्या ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या हस्ते होणार असून 25 डिसेंबरपर्यंत खकय्यांना मालकणी खाद्यपदार्थांच्या खजिन्याचा आस्वाद घेता येणार आहे.

शिवसेनेच्या वतीने दरवर्षी या मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा त्याचे 24 वे कर्ष आहे. मुलुंड पूर्व, गव्हाणपाडा येथील कामनराक मुरांजन शाळेशेजारील साईनाथ हाईट्ससमोरील पटांगणात हा भव्य महोत्सक होणार आहे. उद्या, बुधवारी सायंकाळी 7वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. 13 ते 25 डिसेंबर असा 13 दिवस हा महोत्सव रंगणार आहे. विविध कार्यक्रम हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. दैनिक ‘सामना’ या महोत्सकाचा माध्यम प्रायोजक आहे.

या मालवणी महोत्सवास शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, आमदार-विभागप्रमुख रमेश कोरगावकर, आमदार सुनील राऊत, ईशान्य मुंबई समन्वयक संजय पाटील, महिला आघाडी संघटक राजराजेश्वरी रेडकर यांच्यासह अनेक मान्यवर भेट देणार आहेत. मालकणी महोत्सवाचे आयोजन माजी उपविभागप्रमुख अनंत म्हाब्दी व रामू तोंडवळकर यांनी केले असून ‘तुमका येऊकच क्हया’ असे आवाहन त्यांनी केले आहे.