
भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसाठी 4 वर्षांचा वेतन करार करण्यात आला आहे. या ऐतिहासिक करारामुळे कर्मचायांना 9 ते 23 हजार रुपयांपर्यंत घसघशीत पगारवाढ मिळणार आहे. याशिवाय पहिली 2 वर्षे 13 टक्के आणि शेवटची 2 वर्षे 14 टक्के बोनस मिळणार आहे.
मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण देशातील हॉटेल उद्योगात व्यवस्थापनासोबत इतक्या मोठय़ा रकमेचा वेतन करार होण्याची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. भारतीय कामगार सेनेच्या संघटनात्मक ताकदीचा, एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा हा विजय आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, अजित साळवी, निशिकांत शिंदे यांचे मार्गदर्शन व पाठिंबा लाभला. भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य व सेंट रेजिस युनिट अध्यक्ष विवेक करलकर तसेच कार्यकारिणी सदस्य प्रथमेश पाटील आणि सर्व कमिटी सदस्य यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा विजय साकार झाला आहे.
अशी आहे वेतनवाढ
1 ते 3 वर्षे 9,000 रुपये
3 ते 6 वर्षे 14,000 रुपये
6 ते 9 वर्षे 17,000 रुपये
9 वर्षांपेक्षा अधिक 23,000 रुपये




























































