अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी आज निकाल

अदानी आणि हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या, बुधवारी आपला निकाल देणार आहे. अदानी समुहाने समभागांच्या भावात कथित गडबड केल्याचा आरोप हिंडेनबर्ग अहवालाद्वारे करण्यात आला होता. यासंदर्भात दाखल विविध याचिकांवर सुनावणी झाल्यावर सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 24 नोव्हेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता.