बबिता भाभी बुरखा घालून मशिदीत गेली, फोटो शेअर करताच ट्रोलिंगला सुरुवात

छोट्या पडद्यावरील आपल्या दिलखेच अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिता भाभी अर्थात मुनमुन दत्ता. मुनमुन दत्ता हिला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

मुनमुन दत्ता बुरखा घालून ती एका मशिदीत गेली होती आणि तिथले फोटो तिने शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे घायाळ होणारे चाहते वेडेपिसे झाले आहेत. मात्र काही जण असे आहेत ज्यांना तिचे हे फोटो आवडलेले नाहीत. त्यांनी मुनमुनला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ज्या फोटोवरून मुनमुन ट्रोल होतेय ते फोटो कोणते आहेत ते आपण आधी पाहूयात.

मुनमुन दत्ता ही तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बबिता भाभीची भूमिका साकारते

ती सध्या दुबईला फिरायला गेली आहे

तिने अबूधाबीतील मशिदीलाही यावेळी भेट दिली.

तिथलेच हे फोटो असून ते तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मुनमुनने काळ्या रंगाचा बुरखा परिधान केला आहे.

तिचे हे फोटो आतापर्यंत 45000 लोकांनी लाईक केले आहेत.

हे फोटो पाहून संतापलेल्या ट्रोलर्सनी तिला उद्देशून म्हटलंय की, हिंदू आहेस तर मंदिरात जा.

दुसऱ्या एकाने म्हटलंय की मंदिरे कमी पडली होती, ज्यामुळे ही मशिदीत गेली.

अनेकांनी तिच्या पोस्टवर जय श्री राम अशा घोषणा डकवल्या आहेत.

मुनमुन दत्ता हिला अशा प्रतिक्रिया येणार याची कल्पना असल्याने तिने फोटो शेअर करत असतानाच एक सूचना लिहिली आहे, ज्यात तिने लिहिलं आहे की, कोणी मूर्खपणे विचारण्यापूर्वी किंवा मूर्खासारखा विचार करण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगते आहे मला, मी हिंदू असल्याचा अभिमान आहे ज्या पद्धतीने इतर लोकं माझ्या धर्माबद्दल आणि विचारांबद्दल आदर बाळगून आहेत त्याच पद्धतीने जर मी दुसऱ्या देशात जात असेन तर तिथल्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे.