ईडीच्या छळाला कंटाळून राजकारणातून संन्यास घेण्याचा खासदाराचा निर्णय

ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर मोदी सरकार विरोधकांना छळण्यासाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. एका खासदाराने ईडीकडून चौकशीच्या नावाखाली देण्यात येत असलेला त्रास सहन न झाल्याने राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार नाही असे या खासदाराने जाहीर केले आहे.

तेलुगू देसम पक्षाचे खासदार एमपी गल्ला जयदेव हे गुंटूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. केंद्र तसेच राज्य सरकार तपास यंत्रणांना आपल्याविरोधात शस्त्रासारखे वापरत असून आपल्या उद्योगाला लक्ष्य करण्यासाठीही त्याचा वापर केला जात असल्याचा आरोप जयदेव यांनी केला आहे. 2018 साली तेलुगू देसम पक्षाने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर तेलुगू देसम पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला होता. या आघाडीतून बाहेर पडल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी जयदेव यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

जयदेव हे अमारा राजा बॅटरीज या कंपनीचे मालक आहेत. त्यांनी म्हटले की राजकीय आणि व्यावसायिक मर्यादांमुळे ते संसदेमध्ये केंद्र किंवा राज्य सरकारविरोधात बोलू शकत नाहीत. मी इका उद्देसासाठी लढत असून मी नुसता दर्शक बनून परिस्थिती पाहू शकत नाही असे जयदेव यांनी म्हटले आहे.

मी राजकारणात असल्याने त्याचा माझ्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे जयदेव यांचे म्हणणे आहे. त्यांनी म्हटले आहे की, “व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य, केंद्र सरकार आणि स्थानिक संस्थांकडून अनेक परवानग्या आवश्यक असतात. त्यामुळे व्यवयाविरोधात यातील कोणत्याही पातळीवर तपास यंत्रणांचा शस्त्र म्हणून आमच्या बाबतीत हेच घडले आहे. आम्ही याविरोधात कायदेशीर लढा देत आहोत,”