प्रियकरासोबत बायको पळाली, नवऱ्याने विवस्त्र करुन गावात धिंड काढली

राजस्थानमध्ये एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने आपल्या पत्नीला विवस्त्र करुन तिची गावात धिंड काढल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस केस दाखल करुन सहा आरोपींना अटक करण्यासाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहे.

प्रतापगढ जिल्ह्यातील एका गावात एका 21 वर्षीय महिलेला विवस्त्र करुन तिचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. ही महिला गर्भवती असून नवऱ्याने विवस्त्र करुन तिची गावात धिंड काढली. त्या व्हिडीओत महिला रडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला तिच्या नवऱ्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला विोवस्त्र केले आणि तिला मारहाण केली.  मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना प्रतापगड जिल्ह्यातील धरियावद कस्बे येथील पहाडा गावची आहे. हा व्हिडीओ चार दिवसांपूर्वीचा असल्याचे बोलले जात आहे. या महिलेचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. तिच्या बाजुच्या गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि तिला दिवसही गेले होते. चार दिवसांपूर्वी ती आपल्या प्रियकरासोबत पळाली होती. जेव्हा कुटुंबाला याबाबत माहिती मिळाली त्यावेळी घरच्यांनी तिचा पाठलाग केला आणि तिला पकडले.

महिलेला गावात आणले. तिच्या नवऱ्याने तिला विवस्त्र केले. यामध्ये महिलेचे आई-वडिल आणि कुटुंबातील अन्य लोकंही सहभागी होते. तिला विवस्त्र करुन तिला मारहाण करत गावात धिंड काढली. तिचा व्हिडीओ बनवला आणि तो शुक्रवारी सोशल मीडीयावर व्हायरल केला. पोलीस घटनेचा तपास करण्यासाठी चार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सहा पथके तयार केली आहेत. त्यामध्ये दोन डीएसपी रॅंकचते अधिकारी आहेत. आरोपींनी आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. पीडित व आरोपी दोघेही आदिवासी कुटुंबातील आहेत. पहाडा गाव देखील आदिवासीबहुल परिसर आहे.