पाकडय़ांचा हिंदुस्थानी चौक्यांवर गोळीबार, बीएसएफचे दोन जवान जखमी

शस्त्र्ासंधी मोडत पाकडय़ांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर बेछूट गोळीबार केला. जम्मू-कश्मीरात अरनिया, आर. एस. पुरा आणि सुचेतगढ सेक्टरमध्ये हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्या, घरांना टार्गेट करीत पाकिस्तानी रेंजर्सकडून तब्बल सात तास गोळीबार सुरू होता. मोर्टर बॉम्बही टाकण्यात आले. या गोळीबारात सीमेवरील बीएसएफचे दोन जवान आणि एक महिला जखमी झाले आहेत. दरम्यान, गोळीबारामुळे सीमेलगत गावातील नागरिक भयभीत झाले असून, विद्यार्थ्यांनी शाळेच्या बंकर्समध्ये आश्रय घेतला आहे.

गुरुवारी रात्री आठच्या सुमारास पाकिस्तानी रेंजर्सने जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला. सीमेलगतच्या गावांवर सहा ठिकाणी हा गोळीबार सुरू होता. त्यानंतर आर. एस. पुरा, सुचेतगढ या सेक्टरमधील गावांवर पाकडय़ांनी गोळीबार केला. हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्या, गावातील घरांना टार्गेट करीत तब्बल सात तास गोळीबार सुरू होता. पाकडय़ांनी मोर्टर बॉम्बनेही हल्ला केला.

2021ची पुनरावृत्ती

2021मध्ये पाकडय़ांनी मोठय़ा प्रमाणावर शस्त्र्ासंधीचे उल्लंघन करून बेछूट गोळीबार केला होता. त्यावेळी जम्मू-कश्मीरात सीमेलगतच्या गावातील काही नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. 2021ची पुनरावृत्ती पाकडय़ांकडून केली जात आहे.