महाराष्ट्र आणि देशाचे हित हेच शिवसेनेचे वचन

महाराष्ट्र आणि देशाचे हितहेच वचन असा शब्द देत शिवसेनेने आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला वचननामाजाहीर केला. या वचननाम्यात विविध घटकांना स्थान देतानाच बेरोजगारी, महागाई आणि आरक्षण अशी कळीच्या मुद्दय़ांवर ठोस आश्वासने शिवसेनेने दिली आहेतशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीनिवासस्थानी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला. मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातून राज्याचे हक्काचे अनेक प्रकल्प गुजरात व अन्य राज्यांत पळवून नेले आहेत. ‘इंडियाआघाडीचे सरकार येताच महाराष्ट्रावरील हा अन्याय पूर्णपणे थांबवू, असे सांगत वचननाम्यातील घोषणांबाबत उद्धव ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली. ‘इंडियाआघाडीच्या वचननाम्यातही सर्वसमावेशक आश्वासने देण्यात आली असून त्यात महाराष्ट्रासाठी आवश्यक बाबी असाव्यात या दृष्टीने शिवसेनेच्या वचननाम्यात त्यांचा समावेश केला गेला आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील बेरोजगारांना गावातच रोजगार

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी नसल्याने तेथील तरुण-तरुणींना शहरांमध्ये, परराज्यांत आणि परदेशात स्थलांतर करावे लागते. ते थांबवण्यासाठी ग्रामीण भागांमध्येच उद्योग उभारून रोजगाराच्या संधी
निर्माण करणार.

मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच आर्थिक व अन्य मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणारी मदत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार

आरोग्य रक्षणासाठी कटिबद्ध

कोविडचा सामना करत असताना राज्यातील आरोग्य यंत्रणेतील उणिवाही समोर आल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक जिह्यातील रुग्णालये अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज करणार. तिथे सक्षम मनुष्यबळ पुरवणार. प्राथिमक आरोग्य केंद्रांमधील सुविधा वाढवणार.

कर दहशतवाद थांबवणार

मोदी सरकारकडून जीएसटीची दडपशाहीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याने व्यापारी, उद्योजकांना त्रास होत आहे. हा कर दहशतवाद थांबवण्यासाठी अर्थतज्ञांचा सल्ला घेऊन सर्व वस्तू व सेवांसाठी एकाच दराने कर वसुली करण्याची सुधारणा केली जाईल.

जी. एस. टी. प्रणाली राबविताना केंद्र सरकार राज्यांना दुय्यम मानते व सर्व निर्णय केंद्राला अनुकूल घेतले जातात. राज्याला केंद्राकडे हात पसरावे लागू नयेत म्हणून त्या यंत्रणेत बदल करणार.

नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविणे शक्य व्हावे म्हणून जी. एस. टी. च्या महसुलातून स्थानीय स्वराज्य संस्थांना योग्य त्या प्रमाणात हिस्सा देण्याची तरतूद करणार

विनाशकारी प्रकल्प राज्यातून हद्दपार करणार

विनाशकारी प्रकल्प उदाहरणार्थ जैतापूर, बारसू, वाढवण यासारखे पर्यावरण आणि जनजीवनास घातक ठरणारे प्रकल्प महाराष्ट्रातून हद्दपार करू आणि पुन्हा येऊ देणार नाही. असे प्रकल्प नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळवून देणार

उद्योग, व्यवसाय आणि रोजगार

– मुंबईत नवे आर्थिक केंद्र स्थापन करून राज्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार

– पर्यटनवाढीला प्रोत्साहन देणार. हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणार. त्यातून स्थानिकांना नोकऱया उपलब्ध होणार

– महाराष्ट्रात उद्योग, व्यवसाय स्थापनेस तात्काळ परवानगी देणारे धोरण आणणार

अन्नदाता शेतकऱयांची विशेष काळजी

–  शेतकऱयांची बियाणे, खते, अवजारांवरील जीएसटी रद्द करणार

–  पीकविम्याचे जाचक ठरणारे निकष काढून टाकणार. शेतमाल नुकसानभरपाई योजनेचा लाभ तत्काळ मिळावा यासाठी योजनेत आवश्यक बदल करणार

–  शेतमालाची नासाडी टाळण्यासाठी गोदामांची उभारणी

– शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेतमालाला उचित हमीभाव मिळवून देणार

– विकेल ते पिकेल या धर्तीवर शेतकऱयांना कोणती पिके घ्यावीत यासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन

– शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी

युवा पिढी विकासाचा कणा

–  महाराष्ट्रातील युवक-युवतींना जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातच मिळवून देणार.

– आधुनिक युगाच्या मागणीनुसार विद्यापीठांतील शिक्षणात बदल करून त्याला संशोधन, कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञान यांची जोड देणार

– शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार.

– खेळ व खेळाडूंसाठी प्रत्येक जिह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणार

– शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि मानसिकता याकडे विशेष लक्ष देण्यासाठी आग्रही राहणार.

– मधुमेह व इतर यांसारखे आजार असणाऱया विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जावे यासाठी योजना राबविणार.

मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून भरीव अर्थसहाय्य घेणार

मुंबई ही आयकर, सीमा शुल्क व अन्य करांच्या माध्यमातून केंद्र सरकारला सर्वाधिक कर देते. त्या तुलनेत मुंबईला पुरेसा वाटा मिळत नाही. एक रुपयातील फक्त आठ पैसे मुंबईला दिले जातात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक तरतूद करून घेऊ, असे वचनही शिवसेनेने दिले आहे.

एक वर्षात 30 लाख नोकऱया देणार महिलांना 50 टक्के जागा राखीव

1 वर्षात 30 लाख सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नोकर भरती करून तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार. केंद्र सरकारमधील सर्व नवीन नोकऱयांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवणार. तसेच  गरीबांसाठी शहरी रोजगार हमी योजना राबवणार.

महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱयांवर कठोर कारवाई

सामाजिक सुरक्षा, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता, महिलांची सुरक्षा आणि सन्मान आदींचाही विचार शिवसेनेने वचननाम्यात गांभीर्याने केला आहे. महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही वचननाम्यात देण्यात आले आहे.

आपले आशीर्वाद असू द्या!

–  शिवसेनेच्या वचननाम्याच्या प्रस्तावनेत उद्धव ठाकरे यांनी मतदारांना आपले आशीर्वाद असू द्या अशी साद घातली आहे. देशातील मतदारांची गेली दहा वर्षे फसवणूक करणाऱया काळय़ाकुट्ट नरेंद्र मोदी राजवटीचा अखेर करणे हेच या निवडणुकीचे प्रमुख उद्दिष्ट असून तोच जनतेचा जाहीरनामा असेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

– इतर पक्ष भ्रष्ट आहेत म्हणणाऱया भाजपाचा निवडणूक रोखे घोटाळा हाच सर्वात मोठा भ्रष्टाचार ठरला आहे. अजून पीएम केअर फंडाचा महाघोटाळा कधी बाहेर येणार याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

–  इंडिया आघाडीने विस्तृत असा जाहीरनामा दिलेला आहे. सत्तेतील भागीदार पक्ष म्हणून शिवसेना त्या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीसाठीसुद्धा आग्रही राहील, असे अभिवचन उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीप्रसंगी दिले.

–  देशातील लोकशाहीवर आलेले संकट व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेला निर्माण झालेला धोका वेळीच लक्षात आल्याने महाराष्ट्रातील जनता जागृत झालेलीच आहे. ही सजग व स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीला मजबूत पाठिंबा देईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

भाजप सरकारला 10 सकाल…

1. 2022 पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट होणार होते त्याचे काय झाले? ऊनकारापाऊस आणि हाडं गोठकणारी थंडी असताना शेतकऱयांना आंदोलन करण्याची केळ का येत आहे?

2. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार होते त्याचे काय झाले? त्याऐवजी उद्योगपतींचे रुपये सव्वादोन लाख कोटी कर्ज का माफ करण्यात आले?

3. वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होतात, त्यानुसार 10 वर्षांत ही संख्या 20 कोटी होते. त्या नोकऱयांचे काय झाले?

4.  गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किमती इतक्या कशा गगनाला भिडल्या?

5. देशात 100 स्मार्ट सिटी निर्माण होणार होत्या त्या कुठे गेल्या?

6. गंगामैया स्वच्छ का झाली नाही?

7. भ्रष्ट राजकारणी जेलमध्ये टाकण्याऐकजी स्वपक्षात का घेतले? नोटबंदीमुळे काय साध्य झाले?

8. महाराष्ट्राचे हक्क आणि अस्मिता पायदळी का तुडविली जात आहे?

9. देशावर एक लाख कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा का वाढविला?

10. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले?

 

 शिवसेनेचा वचननामा पक्षप्रमुख उद्धक ठाकरे यांनी गुरुकारी मातोश्रीनिवासस्थानी प्रसिद्ध केला. यावेळी  शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेतेखासदार संजय राऊत आणि शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते.