अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालयातील सुरक्षाजाळीवर उड्या मारल्या

अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालयात सुरक्षाजाळीवर उड्या मारत आंदोलन केले. 105 दिवसांपासून आम्ही आंदोलनाला बसलो आहेत, आमची कोणीही दखल घेतली नाही. सरकार आपल्या दारी म्हणता आज आम्ही सरकारच्या दारी आलो आहोत असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. धरण प्रकल्पात आमच्या जमिनी गेल्या. आम्हाला मोबदला देऊ, सरकारी नोकरी देऊ अशी आश्वासने देण्यात आली. मात्र आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झाले नाही असं या आंदोलकांचे म्हणणे आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास या प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयातील सुरक्षाजाळीवर उड्या मारल्या. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर या आंदोलकांना जाळीवरून बाजूला हटवले.