पोलंडमध्ये सापडले “व्हॅम्पायर चाइल्ड” चे अवशेष!

व्हॅम्पायर. माणसांचा एक काल्पनिक जमाव. असे म्हणतात, ही माणसे रक्तपिपासू असतात. जगातील आदिवासी जमातीत ही माणसे किंवा जमात असू शकते. या काल्पनिक जमातीवरून परदेशात अनेक चित्रपट निघाले आहेत.

पोलंडच्या स्मशानभूमीत “व्हॅम्पायर चाइल्ड”चा सांगाडा सापडला. हा  5 ते 7 वयोगटातील मुलाचे असल्याचा अंदाज आहे. त्याच्या एका पायाला त्रिकोणी पॅडलॉक बांधलेले आढळले. निकोलस कोपर्निकस विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ डॅरियस पोलिंस्की यांनी यासंदर्भात काही अंदाज बांधले. पायाखालची वस्तू “जीवनाच्या एका टप्प्याच्या समाप्तीचे प्रतीक आहे आणि मृत व्यक्तीच्या परत येण्यापासून संरक्षण करण्यासाठी आहे, ज्याची कदाचित भीती होती,” असे त्यांनी नमूद केले.

व्हॅम्पायर मूल

या मृत बालकाच्या अंगावर ताट आणि एक पॅडलॉक आढळून आले. १७ व्या शतकातील स्मशानभूमीत एका महिलेच्या सांगाड्याचे अवशेष ज्याचा मृत्यू झाला तेव्हा कदाचित ती व्हॅम्पायर असावी असे मानले जात होते. छोट्या मुलाच्या दातांवर हिरवे डागदेखील सापडले. ते बहुधा  मृत मुलाच्या तोंडात टाकलेल्या तांब्याच्या नाण्यापासून उद्भवले असावे. पोलंडच्या ज्या भागात हा लहान मुलाचा सांगाडा सापडला तेथे पूर्वी रक्त शोषणारे कीटक सापडले असावेत असा अंदाज बांधण्यात येत आहे.यातूनच त्या मुलाच्या सांगाड्याला व्हॅम्पायर समजण्यात आले असावे.