ज्ञानवापी मशिदीत कार्बन डेटिंगसंदर्भातील निर्णय 21 जुलै रोजी, वाराणसी न्यायालयानं निकाल राखून ठेवला

Gyanvapi-complex

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाचा भाग म्हणून वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने कार्बन डेटिंगच्या संदर्भातील आपला निकाल राखून ठेवला आहे. 21 जुलै रोजी न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे.

या वर्षी मे महिन्यात, न्यायालयाने काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या संपूर्ण ज्ञानवापी मशीद परिसराचे हिंदुस्थानच्या पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाद्वारे सर्वेक्षण करण्याची विनंती ऐकण्यास सहमती दर्शवली होती. हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने मान्य केली होती.

विशू जैन यांच्या याचिकेवर विचार केल्यानंतर न्यायालयाने ज्ञानवापी मशीद समितीला हिंदू बाजूने केलेल्या निवेदनांवर उत्तर दाखल करण्यास सांगितले.