Virat Kohli – कोहली मायदेशात, पण कसोटी खेळणार

महत्त्वाच्या कौटुंबिक कामासाठी विराट कोहली अचानक मायदेशी परतला आहे, पण तो 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱया बॉक्सिंग डे कसोटीसाठी पुन्हा दक्षिण आफ्रिका गाठेल आणि पहिल्या कसोटी खेळेल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी कळवले आहे.

कोहली दक्षिण आफ्रिका दौऱयावर केवळ दोन कसोटी सामने खेळणार असल्यामुळे त्याने टी-20 आणि वन डे मालिकेतून माघार घेतली होती. तसेच कसोटी संघात निवड झालेला ऋतुराज गायकवाडही बोटाला झालेल्या दुखापतीमुळे मायदेशी परतणार आहे. ऋतुराजच्या बोटाला दुसऱया वन डेदरम्यान झेल टिपताना दुखापत झाली होती. बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो तिसऱया सामन्यातही खेळला नव्हता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)