अल्पसंख्याकांचे प्रश्न मार्गी लावणार; शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे आश्वासन

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उत्तर विभागाच्या वतीने उर्दू व अल्पसंख्याक मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्याला शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांचे उद्बोधन आणि सन्मान सोहळा शिवाजीनगर गोवंडी येथे शिक्षक सेनेच्या सर्व पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत पार पडला.

शिक्षक मेळाव्यासाठी मोठय़ा संख्येने शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थितीत होत्या. शिक्षक सेना कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, सरचिटणीस प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला. उपस्थित सर्वांनी शिक्षक सेनेच्या खंबीर नेतृत्वाला निवडून देणे हाच ध्यास व निश्चय केला. ज. मो. अभ्यंकर मायनॉरिटी आयोगाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्यामुळे अनेक संस्थांची व शिक्षकांची कामे मार्गी लागली याची जाणीव ठेवून सर्व उर्दू विभागाचे शिक्षक अभ्यंकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे विचार आलम खान यांनी मांडले. याप्रसंगी मुकेश शिरसाट, अजित चव्हाण, आर. बी. पाटील, सलीम शेख, मच्छिंद्र खरात, झियाउद्दीन काझी, उत्तर विभाग अध्यक्ष नरेंद्र शिंदे, आप्पा कांबळे, आलम खान, संतोष शेलार, संजय मेकले, महेश काकडे, कैलास गुंजाळ, निरंजन बोरसे, नाना राजगे, सय्यद मापरी, तानाजी सुळे, प्रकाश चराटे, संतोष शिंदे, संतोष नरुटे, सोमनाथ अनभुले, जालिंदर वाघमोडे, गालिब, नानासाहेब जगताप, विजय सूर्यवंशी, प्रवीण वाढवणे, शहाजहान जमादार, वॉर्ड अध्यक्ष साबीर शेख, भाऊसाहेब सरगर, भांबरे सर, प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब घाडगे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.