पुणे शहर पोलीस दलात खांदेपालट, 15 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

शहर पोलीस दलातील १५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी रात्री दिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व नियमानुसार या बदला करण्यात आले आहेत.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात सध्याचे नियुक्तीचे ठिकाण आणि बदलीचे ठिकाण)- दत्तात्रय भापकर (वरिष्ठ निरीक्षक विश्रांतवाडी ठाणे ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा), कांचन जाधव (पोलीस निरीक्षक, गुन्हे येरवडा ते वरिष्ठ निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस ठाणे), विजय पुराणिक (पोलीस निरीक्षक, गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस ठाणे ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा), अनिता हिवरकर (पोलीस निरीक्षक, गुन्हे फरासखाना पोलीस ठाणे ते अमली पदार्थ विरोधी पथक-२), सुनील थोपटे (अमली पदार्थ विरोधी पथक-२ ते नियंत्रण कक्ष), संदीप देशमाने (पोलीस निरीक्षक, गुन्हे, सहकारनगर ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस ठाणे), क्रांतीकुमार पाटील (पोलीस निरीक्षक, दराेडा आणि वाहनचोरी प्रतिबंधक विभाग ते खंडणी विरोधी पथक-१), विनायक गायकवाड (वरिष्ठ निरीक्षक, भारती विद्यापीठ ते दरोडा आणि वाहनचोरी प्रतिबंधक विभाग), दशरथ पाटील (वरिष्ठ निरीक्षक, लष्कर पोलीस ठाणे ते वरिष्ठ निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे),संतोष पाटील (वरिष्ठ निरीक्षक बंडगार्डन ते येरवडा पोलीस ठाणे), बाळकृष्ण कदम (वरिष्ठ निरीक्षक येरवडा ते आर्थिक गुन्हे शाखा), राजेश तटकरे (वरिष्ठ निरीक्षक अलंकार पोलीस ठाणे ते कोर्ट कंपनी), महेश बोळकोटगी (गुन्हे शाखा युनिट पाच ते वरिष्ठ निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे), विष्णू ताम्हाणे (वरिष्ठ निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा युनिट पाच), विजय कुंभार (विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, अभियोग कक्ष)